Wakad Crime News : डाटा एन्ट्रीच्या कामाचे आमिष दाखवून तरुणाची साडेसात लाखांची फसवणूक

हा प्रकार 15 डिसेंबर 2019 पासून 2 मार्च 2020 या कालावधीत कस्पटे वस्ती, वाकड येथे घडला आहे.

एमपीसी न्यूज – डाटा एन्ट्रीचे काम देण्याचे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका तरुणाची सात लाख 52 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 15 डिसेंबर 2019 पासून 2 मार्च 2020 या कालावधीत कस्पटे वस्ती, वाकड येथे घडला आहे.

आशुतोष उमानंद मिश्रा (वय 29, रा. संस्कृती सोसायटी, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रवी वर्मा (मोबईल क्रमांक 77660886015), राजीव (मोबईल क्रमांक 9771631362), निशा (मोबईल क्रमांक 7782844204), अभिषेक (मोबईल क्रमांक 9934493717) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 15 डिसेंबर 2019 ते 2 मार्च 2020 या कालावधीत मिश्रा यांना फोन करून डाटा एन्ट्रीचे काम देण्याचे आमिष दाखवले. मिश्रा यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपींनी सात लाख 52 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपींनी मिश्रा यांना काम दिले नाही. तसेच पैसेही परत न देता त्यांची फसवणूक केली.

याबाबत सहा महिन्यानंतर फिर्याद देण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (डी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.