Chakan : वेअर हाऊसमधून सोळा लाखांच्या बॅटरी लंपास

एमपीसी न्यूज – वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या दोनचाकी व चारचाकी वाहनांच्या 15 लाख 95 हजार 99 रुपये किमतीच्या बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी नऊच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरळी येथे उघडकीस आली.

तुकाराम नामदेव केरकर (वय 26, रा. मोशी आळंदी रोड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथे द लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टाटा ऑटॉकोंप बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वेअर हाऊस आहे. फिर्यादी तुकाराम वेअर हाऊसमध्ये नोकरीस आहेत. तुकाराम यांनी शनिवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास वेअर हाउस बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी वेअर हाऊसचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. वेअर हाऊसमधून 15 लाख 95 हजार 99 रुपये किमतीच्या एकूण 539 दोन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टाटा ग्रीन नावाच्या बॅटरी चोरून नेल्या. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.