Pimpri News: फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने आयुक्तांसमोर ‘एमआयडीसी’तील मांडल्या विविध समस्या

एमपीसी न्यूज – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पालिका अधिका-यांची नुकतीच ‘एमआयडीसीती’ल विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत एमआयडीसी परिसरात असणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधा आयुक्तांसमोर मांडल्या. कचरा प्रश्न, आरोग्य सुविधा, बस स्टॉप, महिलांसाठीही ई – टॉयलेट, उद्योजकांसाठी जॉगिंग पार्क, स्पीड ब्रेकर फुटपाथ व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन उद्योजकांना मुलभूत सुविधा देण्याचे मान्य केले. बैठकीला संबंधित खात्यातील अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होते. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, उद्योजक जसबीदर सिंग, फोरम उपाध्यक्ष वैभव जगताप. कौस्तुभ नारखेडे. दत्ता पाटील. संतोष गायकवाड, प्रफुल भोर प्रशांत पठारे, संभाजी लोखंडे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.