Sobat Sakhichi : सोबत सखीची – कहाणी पिंपल्सची

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. कहाणी पिंपल्सची… या विषयावरील या मालिकेतील हा​ ​दहावा​ ​भाग…


सोबत सखीची – भाग 10

कहाणी पिंपल्सची

​मागच्या आठवड्याच्या व्हिडियो मध्ये मी दोन प्रश्न विचारले होते. तुम्हाला आठवताहेत का ते दोन प्रश्न ? आज मी त्यांची उत्तरं तुम्हाला सांगणार आहे, त्याशिवाय आजच्या लेखामध्ये अजून आपल्याला पिंपल्स विषयी नवीन माहिती जाणून घ्यायची आहे. मागचा लेख किंवा व्हिडियो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या कारण त्या व्हिडियो मध्ये आपण पिंपल्स ची बेसिक माहिती दिली होती आणि आजची माहिती त्याच्याशी निगडीत आहे.

मागच्या आठवड्यात आपण बघितलं होतं की sebaceous gland मधून बाहेर पडणारे सीबम त्वचेच्या पृष्ठ भागावर येते आणि त्वचेला तसेच केसांना आवश्यक तो तेलकटपणा देते. बरेचदा हे सीबम त्वचेवर ज्या opening व्दारा बाहेर येतं, ते opening वेगवेगळ्या कारणांनी block होते आणि सीबम सिबेशियास gland मध्ये साठत रहाते. सिविरीटी अनुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पिंपल्स तयार होतात/ हे ही आपण पाहिलं.

आज आपण पिंपल्स का होतात याची चार महत्वाची कारणं बघूया …

  1. यातलं पहिलं कारण आहे Overproduction – अर्थात काही जणांमध्ये naturally सीबम चे जास्त प्रमाणात सिक्रिशन होणे. म्हणून चेहर्‍याची स्कीन oily असणार्‍या लोकांना पिंपल्स चा सामना जास्त करावा लागतो.
  2. दुसरं कारण आहे  Unhealthy scalp डोक्यात खूप कोंडा झाल्यावर केस विंचरताना तो चेहर्‍यावर पडतो, किंवा केसांना लावलेला हात चेहर्‍याला सतत लावल्याने hair follicle च्या तोंडावर तेल, कोंडा किंवा dead cells साचून hair follicle चे opening ब्लॉक होते.
  3. तिसरं कारण आहे infection – विशिष्ट जंतु bacteria मुळ infection होणे. चेहर्‍यावर साचलेल्या धूळ, oily आणि heavy मेक अप चे थर, हानिकारक कॉस्मेटिक्स  यामुळे सिबेशियस ग्लॅंड मध्ये जंतुसंसर्ग होतो व त्या ठिकाणी लालसरपणा व पुढे जाऊन पस होण्याची प्रवृत्ती जास्त दिसते.
  4. चौथं आणि महत्वाचं कारण आहे – हार्मोन androgen hormones. यात अनेक प्रकारची हार्मोन्स ची नावं घेता येतील, पण  testosterone या हार्मोन चा मोठा वाटा आहे.  Androgen hormones चं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असलं तरी कमी प्रमाणात का होईना ते स्त्रियांमध्येही सापडत. आणि androgen मुळे सीबम secret होण्याच प्रमाण वाढतं. म्हणूनच PCOS च्या अर्थात Poly cystic ovarian syndrome च्या पेशंट मध्येही पिंपल्स जास्त प्रमाणात दिसून येतात. PCOS बद्दल आपण वेगळा व्हिडीओ नन्तर करणारच आहोत, त्यामुळे आता पुढच्या माहितीकडे वळूया.

टीन एज मध्ये सेक्स हार्मोन्स आणि androgens अचानक active होतात. या वाढलेल्या androgen मुळेच टीन एज मध्ये पिंपल्स चं प्रमाण जास्त दिसतं. जरी पुरुषांमध्ये androgen चं प्रमाण स्त्रियांपेक्षा खूप जास्त असतं, तरी पण  काही वर्षांनी पुरुषांमध्ये androgen ची लेव्हल सेट होते आणि एका ठराविक वयानंतर हार्मोन्समुळे येणारे acne त्यांच्यात कमी होतात. तसे ते स्त्रियांमध्येही कमी व्हायला पाहिजे. पण तस होत नाही, कारण स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या चक्रामुळे oestrogen व progesteron या दोन हार्मोन्स ची लेव्हल सतत वरखाली होत असतात. संशोधन असे सांगते की oestrogen ची लेव्हल कमी झाल्यामुळे सीबमचे प्रमाण वाढत. मासिक पाळीच्या आधी आठ ते दहा दिवस estrogen चं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे मासिक पाळीच्या आधी आठ ते दहा दिवस काही जणी मध्ये पिंपल्सचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढतं. इतकच नव्हे तर प्रेग्नंसी आणि पाळी जाण्याच्या वयामध्ये सुद्धा काही जणींना पिंपल्सचा सामना करावा लागतो.

आता बघूया आपल्या पहिल्या प्रश्नाच उत्तर…..टीन एज acne आणि हार्मोनल acne .. टीन age acne साधारण तेरा ते वीस वयोगटात येतात. टीन एज म्हणजे थर्टीन फोर्टीन फिफ्टीन पासून नाईनटीन ट्वेंटी पर्यंत.. या वयोगटात म्हणजेच टीन एज मध्ये  जर चेहऱ्याची कपाळपट्टी, नाक आणि कधीकधी हनुवटीवर  म्हणजे थोडक्यात चेहऱ्यावर T पोझिशन मध्ये पिंपल्स येत असतील तर त्यांना टीन एज acne असं म्हणतात. आणि टीन एज सोडून आणि चेहऱ्याच्या खालच्या भागावर किंवा jaw line च्या जवळ येणाऱ्या पिंपल्स ना hormonal acne म्हणतात. हे पिंपल्स मासिक पाळीच्या आधी ठराविक म्हणजे आठेक दिवस आगोदर येतात  आणि गंमत म्हणजे प्रत्येक महिन्याला ठरलेल्या ठिकाणीच येतात. अशा पिंपल्सना हार्मोनल acne म्हणतात.

आता दुसरा प्रश्न …स्त्री आणि पुरुष यांच्या पिंपल्समध्ये काही फरक असतो का ? उत्तर आहे होय…. काय फरक असतो चला जाणून घेऊया …

  1. पुरूषांच्या शरीरात जास्त मात्रेमध्ये pores असतात,
  2. तसच त्यांची openings सुद्धा मोठी असतात.
  3. पुरुषांच्या sebeceous ग्रंथी स्त्रियांपेक्षा जास्त active असतात, त्यामुळे त्यांच्यात sebum चं प्रॉडक्शन स्त्रियांपेक्षा जास्त असतं.
  4. पुरुष तसे मुळातच beauty conscious नसतात, त्यामुळे चेहरा वरचेवर धुण, चेहरा स्वच्छ ठेवणं यात स्त्रियांपेक्षा जरा… जरा का ? जास्तच मागे असतात.
  5. दाढी करत असताना सतत ब्लेडच्या चेहऱ्यावर घासण्यामुळे केसांच्या मुळाशी जखम आणि infection होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतं.
  6. आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा – पुरुषांच्या शरीरात असलेले इतर androgens त्यांच्यात जास्त पिंपल्स निर्माण करण्यात कारणीभूत ठरतात.
  7. i am sure, तुम्हाला गेल्या आठवड्यातल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आता आपला मोठा आणि महत्वाचा भाग राहिलाय पिंपल्स च्या ट्रीटमेंट चा… तो आपण पुढच्या लेखापसून / व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितले नसतील, त्यांनी ते  बघून ठेवा आणि आणि चॅनेल ला देखील सब स्क्राईब करून ठेवा. मी पुढच्या गुरुवारी नक्की येणार आहे भेटायला, तोपर्यंत धन्यवाद

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

मोबाईल – 9423511070

ई-मेल [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.