Ravet Accident : बीआरटी मार्गातून जाणा-या दोन दुचाकींना भरधाव कारची धडक

एमपीसी न्यूज – बीआरटी मार्गातून जाणा-या दोन दुचाकींना एका भरधाव वेगात जाणा-या कारने पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कार बीआरटीच्या दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे भक्ती शक्ती चौक ते रावेत बीआरटी मार्गावर घडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी रेल्वे स्थानकाकडून बीआरटी मार्गे भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने कार भरधाव जात होती. त्यावेळी कारने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. यातील एका दुचाकीवर दोन जण होते. त्यातील एका दुचाकीवरील पाठीमागे बसलेला सहप्रवासी आणि एक दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकींना धडक दिल्यानंतर कार बीआरटी मार्गातील दुभाजकावर चढली. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. कारमध्ये चार मुले असल्याचेही समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.