Pune News: अवयव दान, देहदानाबाबतच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पुण्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेच्या वतीने आयोजित अवयव दान आणि देहदान संबंधी जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वारगेट येथे झालेल्या या कार्यक्रमाला आयएमएच्या पुणे अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. संजय पाटील, विश्वस्त, माजी अध्यक्ष डॉ.अरूण हळबे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी स्वाती दिवाण यांनी अवयवदानावर पोवाडा सादर केला.

संत ज्ञानेश्वर नर्सिंग महाविद्यालयाच्या मुलींनी पथनाट्य सादर केले. शिवाय विजया वेल्हाळ यांच्या तनिष्क ग्रुपने पथनाट्य सादर केले. शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडीमार्फत त्याच विषयावर अभिवाचन सादर केले. त्यामध्ये चंद्रशेखर जोशी, प्रियांका आचार्य, सुभाष भंडारे व ज्योती कानेटकर यांचा सहभाग होता.

Wakad News: राहुल कलाटे आयोजित गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षिस वितरण बालकलाकार श्रीनिवास पोकळे याच्या हस्ते संपन्न

अवयवदानावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात डॉ. हळबे, डॉ. मीनाक्षी देशपांडे, प्रिती म्हस्के, डॉ. वैशाली भारंबे, डॉ.शीतल महाजनी व श्रीकांत आपटे यांचा समावेश होता. अवयव दान करणारे दाते व इतर सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. डॉ गीतांजली शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपस्थितांना अवयवदानावर शपथ देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.