Wakad News: राहुल कलाटे आयोजित गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षिस वितरण बालकलाकार श्रीनिवास पोकळे याच्या हस्ते संपन्न

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे (Wakad News) आयोजित दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण बालकलाकार श्रीनिवास पोकळे (फेम- नाळ) याच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय दिमाखदार सोहळ्यात वाकड येथे संपन्न झाले.

या सोहळ्यास पत्रकार विश्वास मोरे, अजय जैन, विठ्ठल कलाटे, विजय कलाटे, अर्जुन वाडघरे, विक्रम वाघमारे, जितेंद्र वाडघरे, अजय कलाटे, तुषार भुजबळ, सोमनाथ कलाटे, सागर कलाटे, प्रशांत वाघमारे, युवराज सायकर, बाळा कलाटे, काळू वाघमारे, निखिल कलाटे, गिरीश शेडगे, तेजस मंजिरे, विशाल कलाटे, प्रसाद कुंभार, नितीन केमसे, राहुल भुजबळ व इतर मान्यवर, स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्या बद्धल सर्वांचे आयोजक राहुल कलाटे यांनी आभार मानले.

स्पर्धेचे गृहनिर्माण सोसायटी/मंडळ गटातील विजेते: Wakad News

प्रथम क्रमांक – विस्टेरिया सोसायटी वाकड
द्वितीय क्रमांक – आनंद पार्क मित्र मंडळ ट्रस्ट थेरगाव,
तृतीय क्रमांक – विनोदेवस्ती सोसायटी विनोदनगर,

उत्तेजनार्थ :

क्रांतिवीर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळेवाडी.
श्रीनाथ हाऊसिंग सोसायटी काळेवाडी.
यश संकुल, सोसायटी वाकड.

वैयक्तिक गटातील विजेते:

प्रथम क्रमांक – युवराज मानकर, वाकड
द्वितीय क्रमांक – राज वाकड गावठाण
तृतीय क्रमांक – के जी चिल्ड्रन प्री स्कूल वाकड

उत्तेजनार्थ :

आकाश पवार कस्पटे वस्ती वाकड.
सुजल सरनोबत,
स्नेह प्रतिष्ठान काळेवाडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.