SRA Pradhikaran : आंबेडकर नगर झोपडपट्टीधारकांचे पोलीस बंदोबस्तात स्थलांतर, एसआरए प्राधिकरणाकडून कारवाई

एमपीसी न्यूज : एसआरए प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आंबेडकर नगर झोपडपट्टीतील झोपडपट्टीधारकांना स्थलांतरीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.(SRA Pradhikaran) या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे व राज्य राखीव पोलीस दलाचे अंदाजे 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोला फासले काळे

आंबेडकर नगर झोपडपट्टी ही पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ आहे. येथे स्थलांतरणाची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सकाळी 5 वा पासून आंबेडकर नगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले होते व तेथे पोलीसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.(SRA Pradhikaran) संतोषीमाता चौक ते झिरो बॉईज चौक या रस्त्यावर एक अग्निशमन बंब आठ ते दहा जेसीबी व आठ ते दहा छोटे आणि मोठे टेम्पो तैनात करण्यात आले होते. या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे व राज्य राखीव पोलीस दलाचे अंदाजे 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिक रहिवासी सुमन कसबे म्हणाल्या की, त्या येथे 50 वर्ष राहत आहेत. सकाळ 5 वा पासून पोलीस व अधिकारी येथे आलेले असून आम्हाला घरे खाली करण्यास सांगत आहे. सकाळपासून येथे कुणीही चहा-नाश्ता केलेला नाही. आम्ही सर्वजण उपाशी आहोत. स्थानिक रहिवासी इब्राहिम शेख म्हणाली की, ते सुद्धा इथे 50 वर्ष राहत आहेत. त्यांचे येथे चार खोल्यांचे घर असून मी माझ्या कुटूंबा समवेत राहतो. (SRA Pradhikaran) आम्हाला आता फक्त एकच रूम दिलेली असल्याने त्यामध्ये आमचा एवढा मोठा परिवार कसा राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला. स्थानिक रहिवासी उमेश बनसोडे म्हणाले की, आंबेडकर नगर मध्ये 97 घरे आहेत. काल दुपारी तीन वाजता आम्हाला 48 तासात घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. ही बेकायदेशीर कारवाई असून ती थांबविण्याची विनंती केली

परंतु कारवाई सुरूच ठेवण्यात आली. आमच्या वस्तीतील 50 ते 60 मुले जवळील विठ्ठलनगर मधील मनपा शाळेत जातात. तसेच 50 ते 60 मुले इतर शाळेत जातात.(SRA Pradhikaran) त्यांना ह्या शाळा आता ट्रांजिट कॅम्प पासून लांब आहेत. स्थानिक रहिवासी अर्जुन गायकवाड म्हणाले की, एसआरए अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी ट्रांजिट कॅम्प  यशवंत नगर जवळील नाल्याच्या जागेत बनवला आहे. तेथे सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे. आम्हाला पत्र्याचे रूम बनवले म्हणून दिले आहेत पण त्यामध्ये त्यांनी सकाळी खाली जमिनीवर सिमेंटचे प्लास्टर केले आहे. तिथे घुशी व साप राहतात. स्थानिक लोक आपल्या घरातील साहित्य पोत्यात बांधून आणत असून टेम्पोमध्ये भरत आहेत. हे टेम्पो लोकांचे साहित्य घेऊन ट्रांजिट कॅम्प येथे जात आहेत.

एसआरए चे अधिकारी म्हणाले की, अंदाजे 3 वर्षापूर्वी आंबेडकरनगर साठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करण्यात अली होती. 70 टक्के पेक्षा जास्त लोकांनी ही योजना राबविण्यासाठी संमती दिली होती. त्यानंतर 3(क) ची अधिसूचना काढण्यात आली व त्यावर कोणीही हरकत घेतली नाही. त्यामुळे अंतिम अधिसूचना काढण्यात अली. त्यानंतर 3(ड) प्रमाणे निष्काषण साठी अधिसूचना काढण्यात अली होती.(SRA Pradhikaran) याविरोधात लोकांनी शिखर तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली पण ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक लोकांनी हाय कोर्टात गेले. 29 जुलै 2022 ला हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आली पण त्यांनी आतापर्यंत स्टे ऑर्डर आणलेला नाही. त्यामुळे आजची कारवाई करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.