Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे ते मनपा भवन व तळेगाव दाभाडे ते देहू मार्गे आळंदी बस सेवा सुरु करा

नगरसेवक अरूण माने यांची मागणी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे ते मनपा भवन व तळेगाव दाभाडे ते देहू मार्गे आळंदी अशी बस सेवा सुरु करावी अशी मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ते अरूण माने यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणेचे अध्यक्ष शंकरराव पवार व व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.  

तळेगाव दाभाडे शहर झपाटयाने वाढत आहे. आजूबाजूचे औद्योगिक क्षेत्र मोठया प्रमाणावर असल्याने दळणवळण मोठया प्रमाणावर होत आहे. तळेगाव ते पुणे प्रवास करणा-या नागरिकांची संख्या खूपच मोठी असून बससेवा वडगाव ते निगडी पर्यंत असल्याने पुन्हा निगडी पासून पुण्यात जाण्यासाठी बस बदलावी लागते. असा टप्प्याटप्प्याने प्रवास केल्यामुळे नागरिकांना दुप्पट भाडे मोजावे लागते आणि वेळही खूप वाया जातो.

सध्या लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे ते मनपा भवन अशी बससेवा पूर्ववत सुरू केली तर नागरीकांच्या खर्चात व वेळत बचत होईल. त्याच बरोबर मावळ तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असल्याने देहू आळंदीला जाणा-या वारक-यांची संख्या मोठी आहे त्यामुळे वडगाव ते देहू मार्गे आळंदी अशी बससेवा सुरू करावी असेही माने यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे  अध्यक्ष शंकरराव पवार व व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी पुढील पंधरा  दिवसांमध्ये या दोन्ही मार्गावरच्या बस सेवा सुरू होतील असे आश्वासनही त्यावेळी त्यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.