Bhosari News : एमआयडीसी परिसरात घंटागाड्या सुरू करा – अभय भोर

एमपीसी न्यूज – महापालिकेतर्फे एमआयडीसी परिसरातील कचरा उचलण्यासाटी घंटा गाड्या येत नाहीत. त्यामुळे कच-याची मोठी समस्या निर्माण झाली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यासाठी महापालिकेने एमआयडीसी परिसरात पुन्हा घंटागाड्या सुरू कराव्यात अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, एमआयडीसीच्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य झाले. कंपन्यांमध्ये कचरा भरून ठेवावा लागतो. अनधिकृत टप-यांमधून घंटागाड्या कचरा घेतात. परंतु, कंपनी मधून घेतला जात नाही. महापालिकेतर्फे गाड्या येत नसल्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टी- ब्लॉक परिसरात कंपन्यांमध्ये चार-चार दिवस कचरा सुद्धा साठवून ठेवावा लागत आहे. टी ब्लॉक परिसरात एक ते दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांना अक्षरशा खासगी गाड्यांना पैसे देऊन कचरा घेऊन जाण्यासाठी सांगावे लागते.

महापालिकेने कचराकुंड्या उचलल्यामुळे उद्योजकांसमोर कचरा कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला. महानगरपालिकेतर्फे एकच ट्रक संपूर्ण परिसरात कचरा उचलण्यासाठी असतो. परंतु, तोही वेळेवर येत नाही. कंपनी बाहेरील बाजूस कचरा ठेवल्यास तेथील उद्योजकांना दंड फाडावा लागतो. त्यामुळे टॅक्स भरून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत अनेक उद्योजक व्यक्त करतात. घाणीमुळे कंपन्यांच्या परिसरामध्ये मच्छर वाढले आहेत. रात्रपाळी करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण परिसरात कचरा उचलला जात नाही. महापालिका आयुक्त यांनी यात लक्ष घालावे. एमआयडीसीतील कच-याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी अभय भोर पत्राद्वारे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.