Bjp : तरुणींवरील हल्ल्यांना जरब बसवा

भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयत्या हल्ल्याच्या आणि इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (Bjp) शिष्टमंडळाने भेट घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी कृती आराखडा करण्याची मागणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

Pune : एमएनजीएलची जास्तीत जास्त कनेक्शन देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार सिद्धार्थ शिरोळे

भाजपाच्या शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, दीपक नागपुरे, अमोल कविटकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, संदीप लोकर, बापू मानकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

 

यावेळी भाजपचे (Bjp) प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की,पोलिसांनी आरोपींवर वचक ठेऊन कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी कार्यपद्धत असणे आवश्यक आहे. तसेच गस्तीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे ही राज्य सरकारकडे मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.