Today’s Horoscope 29 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 June 2023
वार – गुरुवार.
29.06.2023
शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- शयनी एकादशी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 16.30 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- हिरवा )
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत जोडीदाराचे मत अवश्य घ्या हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

मिथुन ( शुभ रंग- मरून)
आज तुमचा हौस मौज करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

कर्क (शुभ रंग- लाल)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही व्यवहार रखडले असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेलं.

सिंह (शुभ रंग- हिरवा )
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होऊ शकते. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.

कन्या ( शुभ रंग- मरून)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)
खर्च कितीही वाढला असला तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

धनु (शुभ रंग- पांढरा) – Today’s Horoscope 29 June 2023
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरदारांना आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची आज तुमची तयारी असेल.

कुंभ (शुभ रंग – पांढरा )
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मीन (शुभ रंग – गुलाबी )
आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी जरा हळू चालवा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Bjp : तरुणींवरील हल्ल्यांना जरब बसवा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.