Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी सुभाष जयसिंघानी

एमपीसी न्यूज रोटरी क्लब ऑफ निगडीचा 30 वा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि. 6) पार पडला. कार्यक्रमात रो. सुभाष जयसिंघानी यांची रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिवपदाची सूत्रे म्हणून जगमोहन सिंग भुर्जी यांच्याकडे देण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डॉ. अनिल परमार, शीतल शहा, पंकज शहा, जितेंद्र शर्मा, सुधीर रशिनकर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ निगडीची 2018-19 या पुढील वर्षीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष प्रवीण घाणेगावकर, हेमंत कुलकर्णी, विजय काळभोर, प्रणिता आलूरकर, गुरुदीप सिंग भोगल, हरबिंद्र सिंग दुल्लत, मुकुंद मुळे, धरमवीर चड्डा, सुहास ढमाले, विजय रमणी, केशव मांगे, डॉ. रवींद्र कदम, अण्णारे बिरादार, हिरा पंजाबी, शिवकुमार शर्मा यांची निवड करण्यात आली. 

माजी अध्यक्ष सुभाष सिंघानी यांनी हेमंत कुलकर्णी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना सिंघानी म्हणाले, " संत तुकाराम महाराज पालखी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. पालखी शहरातून जात असताना पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वारकऱ्यांना प्रथमोपचार किट देऊन रोटरी क्लब ऑफ निगडी यंदाच्या सामाजिक कामाची सुरुवात करणार आहे."

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.