एमपीसी न्यूज – माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी 10 वर्षांनी पुणे महापालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रीया कलमाडी यांनी यावेळी दिली. मात्र यावेळी कलमाडी काठीच्या सहाय्याने चालत होते.
काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी शुक्रवारी पुणे महापालिकेला भेट दिली. पुणे फेस्टीव्हलचे आमंत्रण महापालिका आयुक्तांना देण्यासाठी आपण इथं आले आल्याचे कलमाडी यांनी सांगितले.यावेळी कलमाडी काठीचा आधार घेऊन चालत असल्याचं दिसून आले.त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीसुध्दा होते.
सुरेश कलमाडी तब्बल दहा वर्षांनी पुणे महापालिकेत आले आहेत. कॉमनवेल्थ गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. मात्र काही वर्षांपुर्वी त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.