Chinchwad Accident : रिक्षाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज  – भरधाव वेगाने जाणा-या रिक्षाने (Chinchwad Accident) पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी चापेकर चौक ते महावीर चौक रस्त्यावर चिंचवड येथे घडली.

बाळू शांताराम कोळेकर (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दशरथ बाळू कोळेकर (वय 32, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 14/जीसी 9827) चालक संतोष सुखदेव बगाडे (रा. जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shefali Vaidya : पुण्यातील लेखिकेबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याने राष्ट्रवादी पदाधिकारी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील रिक्षा वाहतुकीच्या (Chinchwad Accident) नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांचे वडील पायी रस्ता ओलांडत असताना त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. डोक्याला, डोळ्याला, छातीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.