Sushant case: अद्यापही सुशांतच्या हत्येचे पुरावे नाहीत

मागील काही दिवसांपूर्वी सीबीआय याची सखोल तपासणी करत आहे. मुंबई पोलिसांप्रमाणे सीबीआयनं या प्रकरणी सुशांतशी निगडीत असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मूत्यूची योग्य चौकशी व्हावी म्हणून अनेक वाद प्रतिवादांनंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सुरुवातीला मुंबई पोलिस या प्रकरणी तपास करत होते. पण सुशांतच्या कुटुंबीयांना त्यात काहीतरी काळेबेरं असल्याचे वाटू लागल्याने ते सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे मिळालेल्या निकालानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

मागील काही दिवसांपूर्वी सीबीआय याची सखोल तपासणी करत आहे. मुंबई पोलिसांप्रमाणे सीबीआयनं या प्रकरणी सुशांतशी निगडीत असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली. रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून माहिती समोर आली. परंतु त्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाही. सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत सीबीआयनं क्राईम सीन रि-क्रिएट केला. तसंच मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक रिपोर्ट, संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता यात हत्येकडे बोट दाखवणारे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं टीमचं म्हणणं आहे. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसंच आत्महत्येच्या अँगलवरही तपास केला जाणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एम्सच्या फॉरेन्सिक टीमचा अहवाल आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा आणि ऑटोप्सी रिपोर्टही आहे. मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांचीही चौकशी करण्यात आली. तसंच ड्रग्सचा अँगल आल्यामुळे इडीनं गौरव आर्यालाही चौकशीसाठी बोलावलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.