Talegaon : मधुमेह आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी

एम.आय.एम.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – मावळ आणि परिसरातील नागरिकांसाठी मधुमेह आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १४ आणि १५ फेब्रुवारी 2019 या दोन्ही दिवशी केले होते. डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे औषधवैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डाॅ. दिलीप भोगे तसेच नेत्र विभागाच्या प्रा. डॉ प्राजक्ता सांभारे तसेच इतर सहकारी डॉक्टरांचे मार्फत जवळपास ३३० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

  • या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी, नेत्रपटल तपासणी, तसेच शरीराच्या विविध भागातील संवेदना तपासणी मोफत आणि पुढील उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी राहण्याचा खर्च मोफत असेल, अशी माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी दिली.

या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने अनेक रुग्णांची मोठी सोय झाली असून याचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.