Talegaon : अन्याय, अत्याचार निर्मूलन समिती जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल भांगरे

Anil Bhangre as District Vice President of Injustice, Atrocities Eradication Committee

एमपीसीन्यूज – येथील पत्रकार व शासन नियुक्त भ्रष्टाचार निर्मूलन समिती मावळचे माजी सदस्य अनिल भागाजी भांगरे यांची अन्याय, अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र  भास्कर जाधव यांनी भांगरे यांना निवडीचे पत्र दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेता येत नसल्याने जाधव यांनी इमेलद्वारे नियुक्त पत्र पाठविले आहे.

भांगरे हे सामाजिक, राजकीय, धार्मिक, बहुजन दलित,आदिवासी, अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या मूलभूत हक्क, अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निस्वार्थपणे कार्य करत आलेत, हे लक्षात घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

तसेच भांगरे यांनी समितीच्या वरिष्ठांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची बांधणी करून अन्याय, अत्याचार निर्मुलन समिती बळकट करून आपल्या परिसरात नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात नवीन शाखा उघडून समितीला बळकटी द्यावी, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.