Talegaon : महिलेशी गैरवर्तन करत गल्लीत हुल्लडबाजी करत कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज : गल्लीत येवून मुलींच्या नावे आरडाओरड (Talegaon) करत हुल्लडबाजी करत हटकाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) दुपारी चार वाजता तळेगाव दाभाडे येथील गोसावी वस्ती येथे घडला आहे.

 

याप्रकऱणी महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी किटक उर्फ जय भालेराव (वय 19 रा. तळेगाव दाभाडे), आर्यन उर्फ छोटा बांडी अनिल गरुड (वय 20) व विशाल गुंजाळ (वय 20) यांना ताब्यात गेतले असून वैभव विटे, प्रदिप वाघमारे व दाद्या वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HSC Result : पुणे विभागात 34 विषयांचा निकाल 100 टक्के

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गल्लीमध्ये आरोपींच्या मैत्रिणी (Talegaon) राहतात. आरोपी हे दुचाकीवरून गल्लीत आले व त्यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या नावे आरडाओरड करत हुल्लडबाजी कऱण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना हटकले असता त्यांनी फिर्यादिला शिवीगाळ करत हाताने मारहाण करत त्यांचे कपडे फाडले.

यावेळी फिर्यादीचे दिर त्यांना सोडवायला आले असता आरोपींनी लाकडी दांडा व कोयता यांचा धाक दाखवून खिश्यातील दिड हजार रुपये काढून घेतले. यावरून तळेगाव पोलिसानी तिघांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.