Talegaon Dabhade : तळेगावसह परिसरातील 25 पत्रकारांना उद्या ‘कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणार

एमपीसी न्यूज – ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी’कडून पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि 6 जानेवारी रोजी) तळेगावसह परिसरातील सुमारे 25 पत्रकारांना  “कार्यगौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष मनोज ढमाले आणि प्रकल्प प्रमुख भगवान शिंदे (सर) यांनी दिली.

त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके, साप्ताहिक ‘अंबर’चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर या दोन्ही मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या माध्यमातून समाजात असामान्य कामगिरी करणा-या विविध क्षेत्रातल्या गुणवंताचा सन्मान करण्याचे काम सतत केले जात असते. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असल्याने पत्रकार दिनाचे औचित्य साधून तळेगाव व परिसरातील मान्यवर पत्रकारांचा सन्मान तळेगाव दाभाडे येथील ‘इशा’ हॉटेलमध्ये सोमवारी (दि 6 जानेवारी रोजी) सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीकडून करण्याचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.