Talegaon Dabhade : शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेली शाबासकीची थाप जीवनात अमुलाग्र बदल घडविते – डॉ. सायली गणकर

एमपीसी न्यूज – शिक्षकांनी दिलेली शाबासकीची थाप विद्यार्थ्यांचे (Talegaon Dabhade) जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवित असते. विद्यार्थ्यांना दिलेला विश्वास हा त्याच्या जीवनातील बदलाचा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी ज्ञानी असावे .चिंतन, ध्यान करावे. त्याने अनुभवाची माळ जोडण्यासाठी नेहमी प्रयत्न करावा.आनंदाने शिकवावे. विद्यार्थ्याकडे पाहत असताना  शिक्षकांने आदर्श आणि आशावादी बनावे, असे मत डॉ. डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरू डॉ. सायली गणकर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ  आणि डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी (ता.आंबी ) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळेचे उद्घाटन समारंभाप्रसंगी डाॅ गणकर बोलत होत्या.

या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सायली गणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे,शिवाजी किलकिले,अरुण थोरात, माजी उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, सचिव शांताराम पोखरकर,  जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष मधुकर नाईक,सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मुंबई शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सदस्य कुंडलिक मेमाणे, सुरेश कांचन आदीं उपस्थित होते.

Today’s Horoscope 06 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावेळी बोलताना डॉ सायली गणकर म्हणाल्या की, निंदा नालस्ती, दुष्णे पटकन विसरण्याची किमया ही शिक्षकाला साधता येते. प्रत्येक गोष्ट जागृतीने करावी त्यामुळे आपणामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळं असं नातं निर्माण करण्यात यावे. जीवन आनंदाने कसे जगावे हे मुलांना संस्कारातून ,आपल्या अनुभवातून आणि आपल्या विचारातून सांगितले जावे.

 गटशिक्षणाधिकारी वाळुंज म्हणाले, विद्यार्थ्यांनी कशासाठी शिकले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांचा ब्रेन वॉश करण्याचं काम  शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात. सर्वांनी मिळून संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत.

या कार्यशाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी  नवीन शैक्षणिक धोरण प्रश्नपत्रिका संरचना व आराखडा ,  सेवा जेष्ठता आणि मूल्यांकन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शक यांच्या साह्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दोन दिवसाच्या या कार्यशाळेची चार सत्रामध्ये या विभागणी केली आहे.  मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधीकारी बाळासाहेब उभे,राजेश गायकवाड,विठ्ठल माळशिकारे,विकास तारे,नारायन पवार,प्रतिभा चौधरी, ललीता कांबळे,रेखा परदेशी, प्रा.चेतन मोरे,प्रा.संदिपकुमार आवचार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यक्रमाचे संयोजन मावळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे यांनी केले. पुणे जिल्हा मुख्याध्यापक आणि पुणे जिल्ह्यातील सर्व विषयांचे तज्ञ अध्यापक या ठिकाणी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर  यांनी व  सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी केले. आभार विद्या समितीचे सचिव भानुदास रिठे यांनी (Talegaon Dabhade) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.