Talegaon Dabhade: तळेगावातील शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख

यंदाच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तळेगाव दाभाडे केंद्रातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे हे तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर आहे. यंदाच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तळेगाव दाभाडे केंद्रातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तळेगाव केंद्रातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. त्याचबरोबर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळा क्र 2 चा निकाल 100 टक्के लागल्याने तळेगावातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख अधिकच उंचावलेला दिसत आहे.

यामध्ये सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील निरंजन थिटे, भूमी शिंदे व स्फूर्ती कडूसकर यांनी अनुक्रमे तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नाव व तळेगावच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख अधिकच उंचावलेला आहे.

तळेगाव दाभाडे केंद्रातील माध्यमिक 14 शाळांपैकी 12 माध्यमिक शाळांनी शंभर टक्के निकाल प्राप्त केला आहे. यामध्ये मराठी माध्यमातून नवीन समर्थ विद्यालय, रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन, आदर्श विद्या मंदिर, नगरपरिषद शाळा क्र 2.

तर इंग्रजी माध्यमातून सह्याद्री इंग्लिश स्कूल, कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, जैन इंग्लिश स्कूल, डॉ. अण्णासाहेब चोभे हायस्कूल, कांतीलाल शहा विद्यालय, इंद्रायणी इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर अ‍ॅड पु वा परांजपे विद्या मंदिर या शाळेचा निकाल 98.24 टक्के तर नगरपरिषद शाळा क्र 6 चा निकाल 97.56 टक्के लागला आहे.

यामध्ये सह्याद्री इंग्लिश स्कूलचे परीक्षेचे पहिलेच वर्ष असून त्यांचे सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तर नगरपरिषदेतील शाळा क्र 2 चे परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नगरपरिषदेच्या शाळेत येणारे विद्यार्थी साधारणपणे शिक्षणाबरोबर आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून काही काम धंदा करून मोठ्या परिश्रमाने शिक्षण घेत असतात. त्यामुळे 100 टक्के निकाल हा त्यांच्या आनंदाचा व कौतुकास्पद विषय ठरतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.