Talegaon Dabhade : गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे तळेगाव दाभाडे पोलिसांचे आवाहन

मानाच्या पाच गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक

एमपीसी न्यूज- आगामी गणेशोत्सव शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करीत साजरा करा असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले. तळेगाव दाभाडे शहरातील मानाच्या पहिल्या पाच गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि. 30) पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला गावेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये गणेशोत्सव काळात घेण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

गणेशोत्सव काळात रात्रंदिवस गणेश मांडवात स्वयंसेवकांची नेमणूक करावी, वर्गणी साठी कोणालाही जबरदस्ती करू नये, मिरवणूक लवकर सुरु करून वेळेत संपवावी, वादविवाद टाळावेत, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सोयी उपलब्ध करून ठेवाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.