Talegaon Dabhade : परिसराची स्वच्छता ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – डॉ. संभाजी मलघे

इंद्रायणी महाविद्यालयात 'एक तारीख, एक तास' उपक्रम

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छता पंधरवडा राबवला (Talegaon Dabhade) जात आहे. महात्मा गांधी हे स्वच्छतेसाठी खूप आग्रही होते. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा आणि वारसा जोपासणे हीच खरी स्वच्छांजली ठरेल. परिसराची स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले.

एक तारीख, एक तास हा उपक्रम गांधी जयंती निमित्त इंद्रायणी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. मलघे बोलत होते.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, डी फार्मसीचे प्राचार्य जी ए शिंदे, इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठे, प्रा. एस. आर. जगताप, प्रा. आर आर डोके, प्रा. गणेश म्हस्के, गोरखनाथ काकडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी विद्यापीठ (Talegaon Dabhade) गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दिप्ती पेठे यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, बी फार्मसी, डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता फेरी काढून स्वच्छतेसंबंधी घोषणा दिल्या.

प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गांधीजींच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आपली जबाबदरी असल्याचे नमूद केले.

सरकारने आयोजित केलेल्या या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेचा वसा आणि वारसा पुढील पिढीला सोपविण्यासाठी आपण कटिबद्ध असायला हवे असे त्यांनी सांगितले.

डॉ. मलघे म्हणाले, “या स्वच्छता मोहिमेद्वारे आपल्या महाविद्यालयाचा परिसरच नाही तर सामजिक भान म्हणून आपल्या अवती भवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबारी आहे.

LPG GAS : कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ; बहिणीला दिलेल्या ओवाळणीची व्यावसायिकांकडून भरपाई

आपले घर, अंगण, गाव, महाविद्यालय स्वच्छ केले तरी खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना स्वच्छांजली ठरेल असा आशावाद प्राचार्य डॉ. मलघे यांनी व्यक्त केला. आजच्या दिवशी स्वच्छ भारत, निरोगी भारताचा संकल्प करूया आणि तीच महात्मा गांधी यांना खरी आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. आर. आर. डोके यांनी केले. उपप्राचार्य प्रा. एस. पी. भोसले यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.