Talegaon Dabhade : गणेश मूर्ती संकलन व विधिवत विसर्जन; नगरसेवक संतोष भाऊ भेगडे फाउंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज – नगरसेवक संतोष भाऊ भेगडे फाउंडेशनच्या वतीने गणेश मूर्तींचे संकलन आणि विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाने नदीपात्रात व तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 10 ट्रॅक्टर,12 टेम्पो, 3 पिकअप अशा एकूण 25 वाहनांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे. 

गुरुवार (दि. 16) रोजी गणेश मूर्तींचे व निर्माल्य यांचे संकलन करून भक्तीभावाने विधीवत विसर्जन केले जाणार आहे. फाउंडेशनच्या वतीने शहराच्या विविध भागातून  दुपारी 12 ते 4 या वेळेत हे संकलन केले जाणार आहे. नागरिकांनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींसोबत संपर्क करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फाउंडेशनकडून करण्यात आले आहे.

घोरावाडी स्टेशन, अशोक विक्रम सोसायटी, शेलार चाळ, मरीमाता माळ, खळवाडी, रमाकांत नगर (बौद्ध वस्ती), भेगडे तालीम पर्यंतच्या भागातील नागरिकांनी शंकर भेगडे (7028706464) आणि रुपेश गरुड (8329141963) यांच्याशी संपर्क करावा.

भेगडे तालीम, कैकाडी आळी, पणन मंडळ, भोई आळी ते तळ्यापर्यंतच्या परिसरातील नागरिकांनी शंकर वाजे (8080661960), अक्षय रानवडे (8087444214), धनराज माने (7507757577) यांच्याशी संपर्क करावा.

गणपती चौक, भेगडे आळी, कान्होबा मंदिर, शेतकरी मंडळ, कुंभारवाडा, चाफे मळा, डोळसनाथ मंदिरापर्यंतच्या नागरिकांनी सिद्धेश भेगडे (9860285747), संतोष शेलार (7218207654) यांच्याशी संपर्क करावा.

गणपती चौक, चावडी चौक, शाळा चौक, राजवाडा, डोळसनाथ मंदिरापर्यंत अनिकेत वाघोले (9975004309), साहिल ईराणी (9960890835) यांच्याशी संपर्क करावा.

बनेश्वर मंदिर, दाभाडे आळी, रिकामे मळा, सुभाष चौक, डोळसनाथ कॉलनीपर्यंत प्रणव भेगडे (7709009606), आशुतोष भेगडे (8830507456) यांच्याशी संपर्क करावा.

लिटल हार्टस, लक्ष्मी बाग कॉलनी, श्रीनगरी फेज एक, फेज 2, गणेश कॉलनी, ज्ञानेश्वर नगरीपर्यंत कुणाल नाणेकर (9623173571), अक्षय मुरकुटे (7387303760), सिद्धेश घोडके (7745040080) यांच्याशी संपर्क करावा.

गणपती चौक, बाजारपेठ, राजेंद्र चौक, तेली आळी, मारुती मंदिरापर्यंत यश भेगडे (9607074005), ऋतिक टकले (7507282929), सचिन घोडके (7040076752) यांच्याशी संपर्क करावा.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.