Talegaon Dabhade : शिक्षणात शाॅर्टकट नाही- डॉ. तुकाराम रोंगटे

इंद्रायणी महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

एमपीसी न्यूज- अथक परिश्रम व अभ्यास करूनच शिक्षण घ्यावे लागते. त्यातूनच यशप्राप्ती होते. शिक्षण घेण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात त्यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या विविध शाखेतील एकूण ७९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार चंद्रकांत शेटे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ,माजी आमदार कृष्णराव भेगडे , कार्यवाह रामदास काकडे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विविध शाखेतील एकूण ७९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रोंगटे म्हणाले, “शिक्षणात शाॅर्टकट नसावा. विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देवून काम करावे. अभ्यासात सातत्य असावे.एखादे आवडीचे क्षेत्र निवडून त्यात प्रगती करावी.यश निश्चित मिळेल”

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डी.पी. काकडे यांनी केले. आभार डॉ. मधुकर देशमुख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.