Geeton ka Safar : तळेगावमध्ये शनिवारी विनामूल्य ऑर्केस्ट्रा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, मोहम्मद रफी फॅन क्लब व साक्षी डायग्नोस्टीक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी व मराठी गाण्यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा ‘गीतों का सफर’ (Geeton ka Safar) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम उद्या शनिवारी (दि.07) सायंकाळी 6.30 वाजता तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब मैदान येथे होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक व कार्यक्रमाचे आयोजक विलास काळोखे यांनी दिली.

सर्वत्र गाजत असलेला हिंदी व मराठी गाण्यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा  सादरकर्ते ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ‘  पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक (पुणे) यांचा ‘गीतों का सफर’ (Geeton ka Safar) हा घरातील सर्वांनी पहावा असा कार्यक्रम आहे. हया कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.