Talegaon Dabhade : जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेट-टुगेदर महत्वाचे- प्रा हेमंतकुमार डुंबरे 

पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील सन 2014 च्या बॅचचे गेट-टुगेदर

एमपीसी न्यूज – “गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना (Talegaon Dabhade)उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंतकुमार डुंबरे व सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे मास्टर ट्रेनर यांनी व्यक्त केले. आंबी येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मधील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील 2010- 2014 सालात शिकलेल्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर पार पडले. यावेळी प्रा. डुंबरे बोलत होते.
आंबी येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मधील पद्मभूषण वसंत दादा पाटील (Talegaon Dabhade)कृषी महाविद्यालयातील 2010- 2014 सालात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गेट-टुगेदर (दि 7) पार पडले. एकूण 67 विद्यार्थी हजर होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ एस एस भगत हे होते.

LokSabha Elections 2024 : देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे, पुणे शहरातील 35 गृहनिर्माण संस्थांमध्ये  मतदान केंद्रे

आपल्या भाषणात ते म्हणाले की, “सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे.महाविद्यालयाच्या काळामध्ये ही सर्व मुले खुप कष्ट घ्यायची त्याचीच फळे त्यांना मिळत आहे.प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमवावे अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.”

“गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंतकुमार डुंबरे व सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे मास्टर ट्रेनर यांनी व्यक्त केले.
“महाविद्यालयात शिकवत असताना  मुलांना मी वाटून कामे द्यायची त्याचा फायदा त्या मुलांना भविष्यात व्यवसाय करताना झाला. व ती मुले आता चांगला व्यवसाय करत आहेत, हे बघून खुप समाधान वाटते,” असे उद्गार महाविद्यालत शिकवत असलेल्या प्रा प्रिया खर्डेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मुले व मुली यांच्या चेहऱ्यावर खुप आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमासाठी सध्याचे प्रभारी प्राचार्य बी व्ही खोब्रागडे व सध्याचे काही प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी किरण गोसावी व आभार  विठ्ठल मोरे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.