Talegaon Dabhade : जैन इंग्लिश स्कूलचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलचा रौप्य महोत्सव समारंभ (Talegaon Dabhade)उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी चोख आणि पारदर्शक काम करणारी शाळा म्हणून तसेच कोविड काळात पालकांना सहकार्य केल्याबद्दल शाळेचे भरभरून कौतुक केले. प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी शाळेचा पंचवीस वर्षांचा प्रवास उलगडला.कार्यक्रमात शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
 या सांगता समारंभासाठी संस्थेचे सचिव इंदरकुमार ओसवाल तसेच संचालक( Talegaon Dabhade)दिलीप पारेख,किरण परळीकर,रिकबचंद गुंदेशा,प्रदीप शहा,महेंद्र राठोड,तेजस वाडेकर, संकेत ओसवाल,सिद्धार्थ शहा रणजीत ओसवाल, विलास शहा अजय शहा मान्यवर उपस्थित होते., त्याचबरोबर तळेगाव दाभाडे येथील प्रतिष्ठित श्रीमंत सरदार उमाराजे दाभाडे,याज्ञसेनीराजे दाभाडे, मुख्याध्यापिका सौ अपूर्वा टकले, शुभांगी भोईर यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा डॉ सुधाकर जाधवर यांनी शाळेच्या पंचवीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन शिक्षक आणि आई दोन्हीचे अनन्यसाधारण महत्त्व आजच्या पिढीला कळायलाच हवे असे प्रतिपादन आपल्या भाषणात करत असताना अनेक राष्ट्रीय महापुरुषांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकेल तसेच युवा पिढीने प्रयत्न करा असे आवाहन केले. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षा न करण्याबाबतच्या सरकारच्या धोरणाबद्दल देखील त्यांनी खंत व्यक्त केली. आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्था निर्माण करणे आणि त्या चालवणे अतिशय कठीण काम असताना देखील जैन इंग्लिश स्कूलने सक्षमपणे यशस्वीरित्या मागील पंचवीस वर्षे सातत्यानें शाळेचा विद्यार्थ्यांचा घडवलेला विकास आणि शाळेच्या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेले संचालक मंडळ यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणात प्रमुख अतिथींनी  केला तसेच असे संचालक मंडळ शैक्षणिक संस्थांमध्ये असणे ही काळाची गरज आहे असे उद्गार याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि मंत्रमुग्ध करणारे व्याख्याते जाधवर सर यांनी व्यक्त केले.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी चोख आणि पारदर्शक काम करणारी शाळा म्हणून तसेच कोविड काळात पालकाना सहकार्य केल्याबद्दल शाळेचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष स्थान भूषवणारे उद्घाटक  उद्योगपती राजेशजी शहा यांनी शाळेस शुभेच्छा देऊन शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
याप्रसंगी विज्ञान दिनाचे औचित्य साधून नतालुका स्तरावर घेण्यात आलेल्या मेगा सायन्स एक्जीबिशनचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य कार्यक्रम जैन इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ दीपक शहा यांनी शाळेच्या उंचावलेला आलेखाबद्दल तसेच शालेय उपक्रमांचां सर्व पालक आणि उपस्थित मान्यवरांना परिचय आपल्या मनोगतातून करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शाळेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख संस्कार आणि परंपरा जपणारी विशेषता आपल्या नृत्य आणि गायनातून सादर केली.
 या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचा सर्व शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी  जीतोचे माजी अध्यक्ष अचलजी जैन,उद्योजक हेमेंद्र शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सौ विजया शिंदे यांच्या नेतृत्वामुळे हा सांगता समारंभ अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथींचा परिचय अनघा कुलकर्णी यांनी करून दिला तर सूत्रसंचालन कविता फाकटकर आणि आरती पेंडभाजे यांनी केले. आभार राकेश ओसवाल यांनी मानले.
कार्यक्रमासाठी दहावीचे सर्व विद्यार्थी आणि दहावीपर्यंतच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अतिशय वाढली आणि त्यांनी शाळेबद्दलचे प्रेम विश्वास आपल्या उपस्थितीतून व्यक्त केला. याप्रसंगी तळेगावातील सर्व नामांकित संस्थांचे संस्थापक,मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग,माजी शिक्षक, माजी विद्यार्थी,तळेगावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.