Talegaon Dabhade : राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सिद्धी दाभाडे हिला सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज – राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade)  येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या सिद्धी दाभाडे या विद्यार्थिनीने 14 वर्षाखालील 50 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवले. या यशामुळे तिची भोपाळ मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Chinchwad : मूर्तीदान उपक्रमात 11 हजारपेक्षा अधिक मूर्त्यांचे संकलन

नुकत्याच लातूर (उदगीर) या ठिकाणी पार पडलेल्या राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील पुणे विभागातील हाय विजन इंटर नॅशनल स्कूलची पै.सिद्धी दाभाडे हीने सुवर्णपदक पटकावले. तिची 2 ते 8 ऑक्टोबर भोपाळ (मध्य प्रदेश) या ठिकाणी होणा-या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली असल्याची माहिती साईबाबा कुस्ती संकुलचे एनआयएस कुस्ती कोच पै. नागेश राक्षे यांनी दिली.

पै.सिद्धी हि कामगार केसरी पै.दिपक दाभाडे यांची मुलगी असून समाजातील विविध स्तरातुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.