Talegaon Dabhade : तळेगावच्या सर्वांगीण विकासात सचिन शेळके यांचे मोठे योगदान – केशवराव वाडेकर

सचिन शेळके यांना द्वितीय स्मृतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हा स्पार्क असलेले जिद्दी कार्यकर्ते होते. त्यांचा कामाचा झपाटाही दांडगा होता. तळेगावच्या सर्वांगीण विकासामधील त्यांचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांनी काढले.

तळेगाव दाभाडेचे दिवंगत माजी नगराध्यक्ष व भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त तपोधाम कॉलनीतील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, सुरेशभाई शहा, नामवंत पैलवान मंगलदाल बांदल, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर, उद्योजक बाळासाहेब शेळके, नगरसेविका कल्पना भोपळे, शोभा भेगडे, नगरसेवक संदीप शेळके,रोहित लांघे, अमोल शेटे, अरुण भेगडे, उद्योजक संतोष शेळके, भाजपचे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आवारे तसेच संदीप काकडे, सुनील करंडे प्रमोद देशक, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

वाडेकर म्हणाले की, सचिन शेळके यांचे काम असेच पुढे चालू राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. तळेगावला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करूयात.

सुशील सैंदाणे म्हणाले की, सचिन शेळके यांचे अकाली जाणे क्लेशदायक होते. कष्टातून पुढे आलेल्या शेळके परिवारातील या तरुण नेत्याने कुस्ती, समाजकारण, राजकारण यावर ठसा उमटवला. सर्व पदांच्या माध्यमातून शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

सचिनभाऊ वयाने लहान असले तरी आमच्या सारख्या वयाने जास्त असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही स्फूर्ती देणारे होते, या शब्दांत गिरीश खेर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रीकृष्ण मुळे, भास्कर भेगडे, लक्ष्मण माने आदींचीही यावेळी भाषणे झाली.

इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या वतीनेही यावेळी सचिनभाऊंच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहण्यात आली. सचिन शेळके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध संस्थांना शेळके परिवाराच्या वतीने देणगी देण्यात आली. सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.