Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन (Talegaon Dabhade) उत्साहात साजरा करण्यात आला. मोबाईल फोनचा वापर कमी करणे तसेच पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. ध्वजारोहण, राष्ट्रगीत, झेंडागीत, राज्यगीत सादर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जय जवान-जय किसान, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून काढला.

यावेळी प्रमुख अतिथी वास्तुविशारद विनय सुर्वे,तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.अनिकेत काळोखे,शाळेचे संस्थापक चंद्रकांत काकडे,अध्यक्ष संदीप काकडे,सचिव प्रशांत शहा,  लायन्स क्लबचे इतर मान्यवर, तळेगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मंगलाताई काकडे,  खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायले. शाळेतील विद्यार्थिनींनी झेंडागीत व राज्यगीत सादर केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यानी जय जवान – जय किसान, वंदे मातरम्,भारत माता की जय, अशा घोषणा देत शाळेचे मैदान दुमदुमून टाकले.

Vadgaon : मोरया महिला प्रतिष्ठानच्या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रम प्रसंगी अनिकेत काळोखे आपल्या भाषणात म्हणाले, की विद्यार्थ्यानी मोबाईलचा वापर कमी करून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.’  तसेच विनय सुर्वे यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,  प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांचा आदर करावा, शिक्षणाबरोबर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी.’ भारताची सर्व क्षेत्रातील प्रगती विषद करताना, विद्यार्थ्यांने आपल्या राष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी आपले व्यक्तिमत्व विकसित करावे, असे सौ. गौरी काकडे विध्यार्थ्यांना आपल्या भाषणात उद्देशून म्हणाल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी डिजिटल शिक्षणाचा विद्यार्थ्यानी लाभ करून घ्यावा, असे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या.

स्वातंत्र्यदिनानिमित्त इयत्ता 8 वीतील विद्यार्थींनी मित्तल वेराट हीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी तील विध्यार्थी भार्गव पागे याने केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात (Talegaon Dabhade) आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.