Talegaon Dabhade : आंतर महाविद्यालयीन वेट लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. विद्यालयाच्या नऊ खेळाडूंनी आपल्या गटात यश संपादन केले आहे.

नम्रता कुंभार (45 किलो, द्वितीय क्रमांक), चेतना घोजगे (49 किलो, प्रथम क्रमांक), प्रतिक्षा कडू (71 किलो, प्रथम क्रमांक), प्रणोती नांबरे (71 किलो, द्वितीय क्रमांक), रुचिका ढोरे (81 किलो, प्रथम क्रमांक), ऋषिकेश चव्हाण (67 किलो, प्रथम क्रमांक), अक्षय म्हाळसकर (71 किलो, तृतीय क्रमांक), चिराग वाघवले (102 किलो, प्रथम क्रमांक), सौरभ वाडकर (102 किलो, द्वितीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यींनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. त्याचबरोबर पुढील आंतर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.