Talegaon Dabhade : जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी अण्णाराव कोळी यांची निवड

यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी कु. विराज कोळी

एमपीसी न्यूज- जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेचा तिसरा व यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडेचा पहिला पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी अण्णाराव कोळी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष ऍड. देविदास टिळे यांच्याकडून कोळी यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे गगन जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गोंदेगावे, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनचे अशोक मेहता, डॉ. रमेश डोळे, मनोहर पालन , रमेश बाविस्कर, शंकर हादीमणी हे उपस्थित होते.

यावेळी लेखक, वक्ते आणि पत्रकार जगन्नाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांना ‘जायंट्स विशेष सहकार्य सन्मान’ने गौरविण्यात आले.
शपथग्रहण समारंभाचे अध्यक्ष म्हणून योगेंद्र डोळस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी व सभासदांना शपथ दिली.यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे व यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडेचे सर्व सभासद, नवीन कार्यकारिणी सदस्य व नागरिक उपस्थित होते.

वर्ष 2019-20 साठी नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे
अध्यक्ष – अण्णाराव कोळी, उपाध्यक्ष – हिरामण बोत्रे, उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर लोखंडे, कार्यवाह/सचिव – प्रा. सुरज कुर्डे, खजिनदार – रवींद्र कोळेकर,
सदस्य – नितीन पाटील, कल्याणी लोखंडे, प्रवीण पाटील, सुनील साखरे, बाळासाहेब जामदार, युवराज बडगुजर, गुलाब पारखी.
संपर्क प्रमुख – सुमित पारखे

यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडे
अध्यक्ष – कु. विराज कोळी, उपाध्यक्ष – कुमारी काव्या देवधरे, उपाध्यक्ष – कुमारी संपदा लोखंडे, कार्यवाह- कु मृदुला बोत्रे, खजिनदार – तन्मय जामदार
सदस्य – कु आयुशका कोळेकर, कु स्नेहल सिंग, कु ऊर्जा वडगये, कु सुर्यांश खिस्ते.
संपर्क प्रमुख – कुमारी चैत्राली कोळी

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेने आजपर्यंत आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नधान्य वाटप, स्वच्छता मोहीम, अवयव दान विषयावर समाज प्रबोधन, रक्तदान शिबीर, कपडे वाटप असे विविध उपक्रम राबवले. यावेळी नवीन सदस्य व काही नागरिक अशा आठ जणांनी अवयवदान शपथ घेतली. सूत्रसंचालन डॉ. जनार्धन डेरे व वंदना कोळी यांनी केले. इंजि. संदीप गोंदेगावे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.