BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : संतोष खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी किकबॉक्सिंग व नृत्य स्पर्धा

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष दत्तात्रय खांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय किकबॉक्सिंग व तालुकास्तरीय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे,, मावळ नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव स्टेशन,या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचा वाढदिवस (दि. 12) रोजी अत्यंत उत्साहात अनेक स्पर्धाच्या आयोजनातून साजरा करण्यात येणार आहे.

यामध्ये राज्यस्तरीय महिला व पुरुष किकबॉक्सिंग स्पर्धा विविध वजनी गटामध्ये मंगळवारी (दि. 11) सायंकाळी 4 वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे आयोजित केल्या आहेत. यामध्ये पुरुषासाठी 51 किलो, 60 किलो, 70 किलो 80 किलो खालील वजनी गटाबरोबर 80 किलोच्या वर खुल्या गटामध्ये स्पर्धा होणार आहे. आकर्षक बक्षिसाचे नियोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार श्री कृष्णराव भेगडे, वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोशिएशनचे चेअरमन संतोष बारणे, वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोशिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक गणेश भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, महाराष्ट्र प्रदेश मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते संतोष दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच तालुकास्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन मंगळवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप डान्स व सोलो डान्सचे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसाचे नियोजन करण्यात आले आहे. याचा बक्षीस समारंभ 12 जून रोजी सकाळी 11 वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे करावी असे आवाहन उपाध्यक्ष दादासाहेब उ-हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव मिलिंद शेलार सर, प्रकल्पप्रमुख रजनीगंधा खांडगे, सहप्रकल्पप्रमुख शबनम खान यांनी केले आहे.

तसेच बुधवारी (दि. 12) जून रोजी सकाळी साडेदहा वाजता संतोष दत्तात्रय खांडगे यांचा अभीष्टचिंतन सोहळा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे आयोजित केला आहे. यावेळी हास्य कवी बंडा जोशी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.