Talegaon Dabhade News: दारूच्या नशेत घरात आलेल्या व्यक्तीचे पाडले दात

एमपीसी न्यूज –  दारूच्या नशेत रस्ता चुकून घरात (Talegaon Dabhade News) आलेल्या व्यक्तीला दोघांनी बेदम मारहाण केली. यामध्ये व्यक्तीचे तीन दात तुटून तोंडाला दुखापत झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी अडीच वाजता मावळ तालुक्यातील पुसाणे गावातून दिवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

संतोष प्रल्हाद सावळे (वय 32, रा. दिवड, ता. मावळ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास लक्ष्मण साठे (रा. साठे साई, ता. मुळशी), रमेश पांडुरंग चव्हाण (वय 39, रा. पुसाणे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

EPFO : फसव्या फोन, एसएमएसपासून सावध रहा – ईपीएफओचे आवाहन

फिर्यादी संतोष सोमवारी दुपारी पुसाणे गावच्या कमानीपासून पुढे दिवड गावाकडे जात होते. संतोष दारूच्या नशेत असल्याने रस्ता चुकून पुसाणे गावातील वस्तीवरील एका घरात गेले. त्यावेळी त्या घरासमोर असलेल्या आरोपी दोघांनी संतोष यांना शिवीगाळ करून (Talegaon Dabhade News) मारहाण केली. आरोपी रामदास याने संतोष यांच्या डोक्यात, कपाळावर, भुवईच्या वरती, पायाला, हाताला मारून गंभीर दुखापत केली. तर, आरोपी रमेश याने संतोष यांना दगडाने मारले. यात त्यांचे वरील बाजूचे दोन, जबड्याचा एक असे तीन दात पडून ओठांना, तोंडाच्या आतील बाजूला गंभीर जखम झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.