crime of molestation : संबंध ठेवण्यासाठी तरुणीवर दबाव, विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – संबंध ठेवण्यासाठी तरुणीने नकार दिलेला असतानाही पूर्वीच्या मित्राने संबंध ठेवण्यासाठी वारंवार फोन करून तरुणीवर दबाव टाकला. ही घटना जानेवारी 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत ताथवडे, हिंजवडी परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य सुनील काटे (पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात विनयभंगाचा (crime of molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade News: दारूच्या नशेत घरात आलेल्या व्यक्तीचे पाडले दात

आरोपी अजिंक्य आणि फिर्यादी हे पूर्वी मित्र होते. तरुणीने जानेवारीत कोणत्याही प्रकारचे संबंध (crime of molestation) ठेवायचे नाहीत, असे आरोपीला स्पष्ट सांगितले होते. तसेच तरुणीने आरोपीच्या घरच्यांना देखील याबाबत सांगितले. तरीही आरोपीने तरुणीचा पाठलाग केला. फिर्यादीला त्यांच्या कॉलेजमध्ये येऊन भेटला, संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. फिर्यादीने त्याचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर आरोपीने मित्रांच्या फोनवरून फिर्यादिस आणि तिच्या मित्र मैत्रिणींना कॉल करून त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.