EPFO : फसव्या फोन, एसएमएसपासून सावध रहा – ईपीएफओचे आवाहन

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना भविष्य निर्वाह निधीतून (EPFO)  बोलत असल्याचे फसवे फोन, एसएमएस येत आहेत त्यासंदर्भात नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन भविष्य निर्वाह विभागाकडून करण्यात आले आहे.

 

यासंदर्भात भविष्य निर्वाह निधी विभागाने  (EPFO) एक परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यात म्हंटले आहे की, क्लेम सेटलमेंट,वाढीव पेन्शन, ईपीएफओव्दारे दिलेल्या कोणत्याही सेवेसाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगणाऱ्या वेबसाइट,टेलिकाल,एसएमएस, इमेल,सोशल मीडियाच्या बनावट ऑफरपासून सावध राहण्याचे आवाहन ईपीएफओतर्फे करण्यात आले आहे.

 

Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थानच्या वतीने वारक-यांचा सन्मान

 

इपीएफओने (EPFO) या पत्रकात म्हंटले आहे की, तुम्ही चुकून तुमची क्रेडेन्शियल्स उघड केली असल्यास, तुमचे पासवर्ड लगेच बदला.कोणतीही शंका व अधिक तपशीलासाठी, ईपीएफओ सदस्य www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करु शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.