Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थानच्या वतीने वारक-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय वारकरी मंडळ (Vadgaon Maval) व श्री पोटोबा देवस्थान यांच्या वतीने वडगाव मध्ये वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाची ही परंपरा मागील 11 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी  जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या सौजन्याने  पंढरपूरला पायी जाणाऱ्या मावळ तालुक्यातील 36 दिंड्यांना स्वयंपाक करण्यासाठी शेगडी देऊन दिंडीतील विणेकरी, अध्यक्ष व महिला भगिनी यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,यांनी देवस्थानच्या कार्याला सर्वोतपरी मदत करू आश्वासन दिले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल वारकरी मंडळ व देवस्थानचे कौतुक केले. श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थानच्या कार्याचा आढावा दिला.
यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, ह भ प सुखदेव महाराज ठाकर,ह.भ.प.मंगल जगताप, ह भ प तुषार दळवी, ह भ प दत्तात्रय शिंदे, ह भ प दत्तात्रय टेमघिरे, भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जेष्ठ नेते सोपानराव ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अरविंद पिंगळे,शांताराम बोडके,संतोष कुंभार, पंढरीनाथ ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण, अर्चना म्हाळसकर,किरण म्हाळसकर सुनिता भिलारे, संभाजी म्हाळसकर,ॲड विजयराव जाधव,पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, वडगाव गट अध्यक्ष नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे,शंकर पगडे, शांताराम म्हाळसकर, संजय कालेकर,दत्तात्रय गरुड कल्पेश भोंडवे आदींनी संयोजन केले.
कार्यक्रम प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर ठाकर, महादू केदारी, कांतीलाल रसाळ, गणेश मोहिते व ह भ प पौर्णिमा तळावडे यांना विशेष निष्ठावंत वारकरी व उत्कृष्ट गायक म्हणून सन्मानित (Vadgaon Maval) करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.