T 20 Cricket : ‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; फार्मा इलेव्हन, फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी

एमपीसी न्यूज – एजीएएस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी – 20 (T 20 Cricket)  क्रिकेट  स्पर्धेत फार्मा इलेव्हन आणि फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

 

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला आहे. फे्रन्ड्स क्रिकेट क्लब, गेम स्विंगर्स, एल.के.इलेव्हन, आयोध्या वॉरीयर्स, इलेव्हन स्टॅलियन्स्, फार्मा इलेव्हन, जोशी स्पोर्ट्स, माईटी ईगल्स् इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स, ट्रोजन्स् इलेव्हन, सुप्रिम इलेव्हन, एसएसके इलेव्हन हे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.

 

 

 

सुदर्शन गुणे याच्या अष्टपैलू खेळीमुळे फार्मा इलेव्हन संघाने जोशी स्पोर्ट्स संघाचा 79 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना फार्मा इलेव्हन संघाने 20 षटकात (T 20 Cricket)  8 गडी गमावून 198 धावा धावफलकावर लावल्या. सुदर्शन गुणे याने 53 धावा तर, अमोल लहासे याने नाबाद 25 धावा केल्या. या आव्हानाला उत्तर देताना जोशी स्पोर्ट्स संघाचा डाव 16.1 षटकामध्ये 119 धावात आटोपला. किरण बोराटे (19 धावा), अनिल के. (30 धावा) आणि पुष्कर कुयाते (19 धावा) यांनी प्रतिकार केला. फार्मा संघाच्या सुदर्शन गुणे याने 22 धावात 4 गडी टिपले. याशिवाय विकेश पवार (2-19) व आनंद नाजन (2-25) यांनीही चमकदार गोलंदाजी केली.

अमित गणपुले याच्या 86 धावांच्या तडफदार खेळीमुळे फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने माईटी ईगल्स् इलेव्हन संघाचा  113 धावांनी धुव्वा उडवीत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात (T 20 Cricket)  239 धावांचा डोंगर उभा केला. अमित गणपुले याने 30 चेंडूत 6 चौकार व 8 षटकारांसह 86 धावांची खेळी केली. प्रफुल्ल मानकर याने नाबाद 72 धावा चोपल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 49 चेंडूत 133 धावांची भागिदारी करून संघाला विशाल धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना माईटी ईगल्स् इलेव्हन संघाने 16.4 षटकात 126 धावा केल्या.

 

सामन्याचा संक्षिप्त निकाल – गटसाखळी फेरी 

फार्मा इलेव्हन – 20 षटकात (T 20 Cricket)  8 गडी बाद 198 धावा (सुदर्शन गुणे 53 (29, 9 चौकार, 2 षटकार), अमोल लहासे नाबाद 25, पुष्कर कुयाते 3/42, गणेश जोशी 3/12) वि.वि. जोशी स्पोर्ट्स –  16.1 षटकात 10 गडी बाद 119 धावा (किरण बोराटे 19,  अनिल के. 30, पुष्कर कुयाते 19,  सुदर्शन गुणे 4/22,  विकेश पवार 2/19, आनंद नाजन 2/25); सामनावीर – सुदर्शन गुणे

फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब – 20 षटकात  (T 20 Cricket)  5 गडी बाद 239 धावा (अमित गणपुले 86 (30, 6 चौकार, 8 षटकार), प्रफुल्ल मानकर नाबाद 72 (33, 10 चौकार, 3 षटकार), सचिन जयवंत 41, विकास राठोड 1/29); (भागिदारी – चौथ्या गड्यासाठी अमित आणि प्रफुल्ल 133 (49) वि.वि. माईटी ईगल्स् इलेव्हन – 16.4 षटकात 10 गडी बाद 126 धावा (फैझ शेख 25, विकास राठोड 26, तुषार क्षीरसागर 26, ओजस जाधव 3/23, महेश शिंदे 3/17, उमेश शिंदे 2/26);  सामनावीर – अमित गणपुले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.