Illegal Tree Cutting : हॉकी स्टेडियम येथे बेकायदेशीर वृक्षतोड; वृक्षप्रेमींचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी नेहरुनगर (Illegal Tree Cutting) येथील हॉकी स्टेडियमच्या बाजुची 100 हून अधिक वृक्षांची तोड केली आहे. बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. तर, वृक्षतोडीला परवानगी दिली आहे. पण, कोणत्या झाडाला दिली हे सांगता येणार नाही, असे उद्यान विभागाने सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोड थांबता थांबेना झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून सातत्याने केला जातो.  महापालिकेकडून परवानगी घेतली जाते काही झाडे तोडण्याची! प्रत्यक्षात मात्र अनेक मोठ्या झाडांची कत्तल केली जाते. अनेकदा छाटणीची परवानगी असते. प्रत्यक्षात बुंद्यापासून झाडे तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे.

School in Pimpri Chinchwad : पालकांची लूट करणाऱ्या शाळेवर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी – राहूल कोल्हटकर

वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, ”महापालिकेच्या ‘क’ प्रभागाच्या लगत हॉकी स्टेडियम आहे. त्या भागातून लाकडाचा एक ट्रक भरुन जाताना दिसला. त्यामुळे तिथे बघायला गेलो. सुरुवातीला काही झाडे तोडलेली दिसली. आतमध्ये गेलो असता छोटी-मोठी 100 हून अधिक झाडे तोडली आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून झाडे तोडली जातात. अधिकृत ठेकेदार नाही. खासगी व्यक्तीने येऊन झाडे तोडली आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड आहे. हॉकी स्टेडियमच्या तिथे नोंदणी बुक देखील नाही.  झाडे तोडण्यासाठी लेखी परवानगी नाही. उद्यान विभागप्रमुखांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती”.

उद्यान (Illegal Tree Cutting) विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, ”झाडे तोडण्यास परवानगी दिलेली आहे. पण, कोणती झाडे तोडण्यास परवानगी दिलेली आहे हे सांगता येणार नाही. उद्यान विभागाचे कर्मचारी तिथे गेले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.