Talegaon Dabhade news : बदलत्या जगासोबत बदल आत्मसात करा

एमपीसी न्यूज – भविष्यकाळात शिक्षण,उद्योग आणि आर्थिक व्यवहार यात प्रचंड क्रांती होईल. सर्व प्रकारचे व्यवहार, सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील. यामुळे पारंपरिक व्यापार आणि वस्तू विनिमयावर मोठे संकट येईल. शिक्षणाच्या बाबतीत देखील प्रचंड बदल होतील आणि एकत्रित शिक्षण पद्धतीची गरज उरणार नाही. शिक्षणाची पद्धत बदलली तर सुमारे 63 टक्के लोकांच्या नोकऱ्या जातील. बेरोजगारीसह अन्य समस्या उद्भवतील. मात्र बदलत्या जगाचे बदल, नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास, व्यक्तिमत्त्व विकास केल्यास आपला (Talegaon Dabhade news) लागणे शक्य आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनामुळे जुने विसरा आणि नवीन शिका हा नवीन मंत्र प्रत्यक्ष व्यवहारात येऊ घातला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अच्युत गोडबोले यांनी येथे केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने आयोजित केलेल्या मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना श्री गोडबोले हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उद्योजक डाॅ दिपक शहा हे होते. यावेळी अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संयोजक समिती अध्यक्ष शैलेश शहा,   संचालक, विलास काळोखे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे,निरूपा कानिटकर, राजश्री म्हस्के, संजय साने,परेश पारेख,संदीप काकडे, युवराज काकडे,विदुर महाजन,प्रा वसंत पवार, एम एम ताटे, बी के रसाळ,रविकांत सागवेकर,बी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे,डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस शिंदे, राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जोशी/दुबेसह या कार्यक्रमास उपप्राचार्य,शिक्षक, विद्यार्थी पालक,अनेक संस्थांचे पदाधिकारी,राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nigdi News : नियोजनपूर्वक अभ्यासाने उद्दिष्टे गाठा- सचिन लोखंडे

पुढे बोलताना गोडबोले म्हणाले की, मी कोणी भविष्यवेत्ता नसून जगण्याचा प्रवाह आणि काळाचा रेटा ज्या पद्धतीने पुढे जातो आहे त्याचा हा अभ्यासपूर्वक विचार मांडत आहे. जगात संगणक व माहिती (Talegaon Dabhade news) तंत्रज्ञान हे क्षेत्र प्रचंड वेगाने वाढत आहे यामुळे आगामी काळात घरी बसून माणसांना सर्व सेवासुविधा आपली आपल्यालाच उपलब्ध करून घेता येईल मात्र यामुळे या यंत्रणेत जे कार्यरत आहेत, सध्या त्यांच्यावर संकट येण्याची शक्यता आहे.

माहिती तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ते तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे हे नवीन तंत्रज्ञान शिकलो नाही, आत्मसात केले नाही तर ती व्यक्ती या सर्व यंत्रणेतून बाहेर फेकली जाण्याची शक्यता आहे तसेच त्यावर बेकारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. भविष्यात या नवीन तंत्रज्ञान युगात आपला तंत्रज्ञानाचा पाया भक्कम केला पाहिजे. इंग्रजी सारख्या जागतिक भाषेचे अवलोकन केले पाहिजे तसेच नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योजक कसे होऊ यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागेल तरच यशस्वी जीवन जगता येईल असे गोडबोले यांनी सांगितले तर यावेळी गोडबोले यांनी संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या दशकात झालेल्या संशोधनाबद्दल सविस्तर माहिती सांगून उद्याचे जग कसे असेल हेही त्यांनी यावेळी विस्तृतपणे सांगितले.

Pune Crime News : लोन काउन्सिलरकडूनच स्टेट बँक ऑफ इंडियाची 47 कोटींची फसवणूक

प्रत्येक गोष्ट घरी करता येत असेल तर प्रवास करायची गरज राहणार नाही. शाळा, काॅलेज एकत्रित शिकणे गरज राहणार नाही. शिक्षणाची पद्धत बदलेल, शिक्षणाचे काय होईल.? 63 टक्के लोकांच्या नोक-या जातील, कामाचे स्वरूप बदलेल अत्यंत वेगाने बदलेल.

सातत्याने बदल स्विकारले पाहिजेच, काळाची पाऊले ओळखून वागले पाहिजे म्हणून  टेक्निकल गोष्टीत तुम्ही प्राविण्य मिळविणे गरजेचे असून, व्यक्तिमत्व विकसित केले पाहीजे. प्रेझेंटेशन असणे, (Talegaon Dabhade news)आणि बडबड गडबडीत सांगण्यापेक्षा ऐकून घेणे आवश्यक असल्याचे गोडबोले यांनी आवर्जून सांगितले.

भविष्यकाळात शिक्षण,उद्योग आणि आर्थिक व्यवहार यात प्रचंड क्रांती होऊन सर्व आर्थिक व्यवहार केवळ मोबाईलव्दारे होतील तर नोटा नाणी चेक बुक वर होणारे व्यवहार हे थांबतील याशिवाय वस्तूविनिमय ऑनलाईन होऊन दुकानदारांच्या व्यापारावर मोठे संकट येण्याची भिती व्यक्ती केली तसेच शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारक बदल होऊन इंटरनेट माध्यमातून शिक्षण उपलब्ध होईल.

यामुळे जगात नोकरी करणा-यावर मोठे संकट येण्याची शक्यता असल्याने जगापुढे हा चिंतेचा विषय राहील. यासाठी सर्वांनी बदलेल्या तंत्रज्ञान युगाबरोबर बदले पाहिजे तरच निभाव लागू शकतो.

यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार उद्योजक क्षेत्रातील पुरस्कार उद्योजक राजेश म्हस्के यांना तर क्रीडा क्षेत्राचा विशेष पुरस्कार क्रीडामार्गदर्शक बिहारीलाल दुबे यांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी विक्रम काकडे,किरण काकडे,अजिंक्य काळभोर, यु.व्ही भोसले आदी मान्यवर प्रायोजकांचा यथोचित सन्मान ज्येष्ठ विचारवंत अच्युत गोडबोले यांचे हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय नियोजन समितीचे अध्यक्ष शैलेश शहा यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा वीणा भेगडे, प्रा  संदीप भोसले यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार संचालक युवराज काकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.