Talegaon Dabhade News : फुटबॉल स्पर्धा, योग कार्यशाळेतून नूतनमध्ये राष्ट्रीय खेळ दिवस साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च महाविद्यालयात ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात फुटबॉल स्पर्धा आणि योग कार्यशाळा घेण्यात आली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च या महाविद्यालयाच्या वतीने ‘ राष्ट्रीय खेळ दिवस ‘ उत्साहाने साजरा करण्यात आला.

या निमित्त फुटबॉल स्पर्धा तसेच योगा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रायन फुटबॉल अकॅडमी पुणे, पतंजली योग समिती व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ राष्ट्रीय खेळ दिवस’ साजरा करण्यात आला.

फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण सात संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये रायन फुटबॉल अकॅडमी ( अ ) संघाने विजेतेपद तर रायन फुटबॉल अकॅडमी (ब) या संघानी उपविजेतेपद पटकावले.

फुटबॉल स्पर्धेसाठी रायन अकॅडमीचे अध्यक्ष मनोज स्वामी तसेच सहकारी रोहित पाठक, विजय कुमार चैतन्य तसेच नूतन अभियांत्रिकीचे क्रीडा शिक्षक राजेंद्र लांडगे व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशांत मस्के यांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून पतंजली योग्य समिती मार्फत योग कार्यशाळा पै. किशोरी लांडगे हिने संचालन केले. या प्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा आणि प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी तिचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.