Talegaon Dabhade News : ‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेचा निकाल जाहीर; सुप्रिया चौधरी प्रथम

एमपीसी न्यूज – मनकर्णिका महिला महासंघ आणि रोख ठोक मावळ यांच्या वतीने गणेशोत्सवात ‘सेल्फी विथ बाप्पा’ ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सुप्रिया विशाल चौधरी यांनी प्रथम तर अक्षय दत्तात्रय दाभाडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुप्रिया चौधरी यांनी भजनी मंडळाचा देखावा केला होता. तर अक्षय दाभाडे यांनी पर्यावरणपूरक पत्रावळ्या पासून सजावट केली होती.

या स्पर्धेचे आयोजन मनकर्णिका महिला मंचच्या अध्यक्षा विना करंडे तसेच रोखठोक मावळचे संस्थापक नितीन हफाकटकर यांनी केले होते.

स्पर्धा पूर्ण करण्यासाठी शैलजा काळोखे, सविता मंचरे, नीलम भोईटे, अर्चना काटे,विना दाभाडे, ऐश्वर्या खांडगे, सायली वशिष्ट, माया भेगडे,शितल काळोखे, स्वाती पाटील, कीर्ती पाटील आदी महिलांनी नियोजनामध्ये सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुप्रिया विशाल चौधरी (पैठणी) द्वितीय क्रमांक अक्षय दत्तात्रय दाभाडे (सोन्याची नथ) तर तृतीय क्रमांक कोमल सागर शिंदे (चांदीचा करंडा) व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली.

यामध्ये प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाने भजनी मंडळाचा देखावा सादर केला होता. द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाने पर्यावरणपूरक पत्रावळ्या पासून सजावट केली होती. तृतीय क्रमांकाचे स्पर्धकाने पुठ्ठ्यापासून मंदिर यांची सजावट केली होती. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मनकर्णिका महिला महासंघाच्या अध्यक्षा विना करंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.