Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे ( Talegaon Dabhade) अंदाजपत्रक प्रारंभिक शिल्लकेसह सादर करण्यात आले. हे अंदाजपत्रक 297 कोटी 48 लाख 24 हजार 895 रुपये जमेचे असून हे अंदाजपत्रक 4 लाख 24 हजार 895 रुपये शिल्लकेचे आहे. या अंदाजपत्रकामध्ये नागरिकांवर कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या अंदाजपत्रकास प्रशासन अधिकारी संदेश शिर्के यांनी मंजूरी दिली असून यामध्ये विकास कामावर विशेष तरतूद केली आहे. हे अंदाजपत्रक प्रशासन अधिकारी संदेश शिर्के व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सादर केले आहे.

याअंदाजपत्रकात स्वच्छता,आरोग्य,पाणी पुरवठा,रस्ते व नगरपरिषदेची नवीन कार्यालयीन इमारत बांधणी या विकासकामांवर विशेष वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेच्या सर्व खर्चासाठी 297 कोटी 44 लाख खर्च अपेक्षित धरला आहे.

या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टी,शासकीय अनुदान, अंशदान व शासकीय अर्थसहाय्य तसेच नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी व लायसन्स, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी,ठेवीवरील व्याज, आदी बाबींमधून नगरपालिकेस 297 कोटी 48 लाख 24 हजार 895 रुपये उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

नगरपरिषद प्रशासनाने आलेल्या उत्पन्नातून आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च,कार्यालयीन खर्च,प्रवास,वाहतूक, इंधन,जाहिरात, मालमत्ता दुरुस्ती,वाहन दुरुस्ती, वीजबिल, पाणी पुरवठा कामाचे आणि व्यवहाराचे कंत्राट,कार्यक्रम खर्च, स्वच्छता अभियान खर्च ,नवीन रस्ते बांधणी व दुरुस्ती,पदपाथ, प्रसाधनगृहे, बांधकाम, शिक्षण,क्रीडा,उद्यान,आदी विकास कामावर 254 कोटी 18  लाख 60 हजार 713 रुपये खर्च दर्शविलेला आहे.

Shirgaon News : पेट्रोल भरण्यास वेळ लागला म्हणून कार चालकाकडून तरुणाला मारहाण

जमेच्या बाजूकडून येणारी रक्कम जास्त असून खर्चाची रक्कम कमी असल्याने हे शिलकेचे अंदाजपत्रक झाले असल्याचे लेखापरीक्षक तथा लेखापाल कैलास कसाब यांनी सांगितले.

–अंदाजपत्रकातील ठळक खर्चाच्या बाबी —

1) आस्थापना 12 कोटी 20 लाख, 2) प्रशासकीय खर्च 21 कोटी 50 लाख, 3) नगरपरिषद मालमत्त्यांच्या दुरुस्त्या 17 कोटी 78 लाख, 4) इतर किरकोळ दुरुस्त्या अनुदाने व अंशदाने 8 कोटी 14 लाख,  5) नविन प्रशासकीय इमारत 15 कोटी,  6) भुयारी गटार योजना 20 कोटी , 7) नाट्यगृह बांधणे 3 कोटी 60 लाख,  8) वैशिष्टपूर्ण योजना अनुदान 28 कोटी,  9) पंधरावा वित्त आयोग 6 कोटी, 10) जिल्हा नगरोत्थान योजना 45 कोटी,  11) राज्य नगरोत्थान योजना 30 कोटी , 12) उद्याने विकसित करणे 20 कोटी ,13) पंतप्रधान आवास योजना 3 कोटी , 14) शहरातील प्रकाश योजना 15 कोटी ,15) इतर विकास कामे 29 कोटी 16 लाख,  16) महिला व बालकल्याण निधी 93 लाख 52 हजार 975, 17) दिव्यांग निधी 93 लाख 52 हजार 975 , 18) आर्थिक दुर्बल घटक निधी 93 लाख 52 हजार 975.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.