Nigdi News : महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Nigdi News) करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 7) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी येथे घडला.

सनी ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 25, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी) अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अण्णाभाऊ साठे वसाहत येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेल्या. तिथून येत असताना सनी याने फिर्यादी महिलेस (Nigdi News) अश्लील कमेंट केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सनी याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.