Talegaon Dabhade: कोरोना नियंत्रणासाठी ‘जनता कर्फ्यू’त सहभागी व्हावे – सत्यशीलराजे दाभाडे

एमपीसी न्यूज – देशापुढील कोरोना विषाणूच्या संकटाशी लढा देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने सहभागी व्हावे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार उद्या (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ या दरम्यान सर्वांनी आपापल्या घरी थांबून ‘जनता कर्फ्यू’ मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे येथील राजघराण्यातील श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी केले आहे. 

सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांचा उद्या (22 मार्च) ला वाढदिवस आहे. सत्यशीलराजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये असलेल्या घरी येत असतात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याने यंदा कोणीही सत्यशीलराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी समक्ष येऊ नये. शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्यांनी सत्यशीलराजे यांना मोबाईल फोनवर, व्हॉट्सएप अथवा फेसबुकवर शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन राजमाता वृषालीराजे दाभाडे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.