Talegaon dabhade : शांताराम मोडक यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील माजी नायब तहसीलदार शांताराम विनायक मोडक (वय 77) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

तळेगाव ज्येष्ठ नागरिक संघ, सत्संग मंडळ, ब्राह्मण सेवा संघाचे कार्यकारिणी सदस्य, कलापिनी हास्य योग्य उपक्रमात त्यांनी स्थापनेपासून मोलाचे योगदान दिले असून विविध सामाजिक संस्थावर त्यांनी उत्तम प्रकारे काम केले होते. करसल्लागार कमलेश मोडक व उद्योजक भूपेश मोडक यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.