Talegaon Dabhade : शोभा भेगडे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

एमपीसी न्यूज – अन्न सुरक्षा कायद्याखाली प्राधान्य व अंत्योदय कुटुंबांना तीन महिन्यासाठी प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार करून घेतली जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ ज्यांना मिळत आहे. ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत.

तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असणाऱ्या शोभा भेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाॅकडाऊनच्या काळात रेशन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

शोभा भेगडे म्हणाल्या, या कठीण काळामध्ये सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते.

महाराष्ट्रासहीत ठिक ठिकाणी लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यांसाठी मोफत धान्य व घरगुती सिलेंडर उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहेत.

व्हिडिओ लिंक
https://twitter.com/PIBMumbai/status/1251889489053704199?s=19

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.