Talegaon Dabhade :विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात करिअर करावे -सुप्रिया साठे

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. नुसते पुस्तकी ज्ञान महत्वाचे नाही. व्यवहारी ज्ञानाची सांगड हवी. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. त्यात करिअर करावे. पालकांनी पाल्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालक या दोघांचीही आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हभप सुप्रिया साठे यांनी केले.

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि  पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्त्री सक्षमीकरण – अर्थात स्त्री शक्ती, नारीशक्ती’या संकल्पनेवर आधारित विविध कला आणि नृत्य सादर केली. नाटिकांचेही सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनयाला  प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले,नगरसेविका शोभा भेगडे,संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, अध्यक्ष सुनील भेगडे,उपाध्यक्ष विजय गरुड, सचिव दत्तात्रय नाटक, खजिनदार राहुल गोळे,शालेय समितीचे अध्यक्ष रामराव जगदाळे,ज्येष्ठ संचालक नगरसेवक अरुण भेगडे पाटील,विलास भेगडे, सुनील गायकवाड,खंडूजी टकले, संतोष भेगडे,मुख्याध्यापिका वैशाली बोन्द्रे, सविता खरडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी कोमल मोहिते या शिक्षिकेस आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुनील भेगडे यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया साठे आणि गणेश भेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रामराव जगदाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कामिनी जोशी, कोमल मोहिते, आदिती चितळे यांनी केले. नियोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख कामिनी जोशी, मेघना वीरकर यांनी केले.

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातील एक क्षण.
सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातील एक क्षण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.